भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले, ते ‘धर्माधिष्ठित भारत’ उभा करू इच्छित होते? किंवा स्वतंत्र भारत धर्माधिष्ठित करू इच्छित होते?
भारतीय राज्यघटना, भारतीय निवडणुका आणि भारतीय लोकशाही या तिन्ही गोष्टी आणि आपल्या पूर्वसुरींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, यांवर आजची संपूर्ण भारतीय लोकशाही उभी राहिली आहे. लोकशाहीत धर्मवाद आला तर प्रत्येक विचारवंत, लेखक, कलावंत आणि भारतावर प्रेम करणारा प्रत्येक माणूस, ज्याला भारत आधुनिक बनवायचा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने धर्माविरुद्ध उभे राहिले पाहिजे.......